Thursday, April 12, 2007

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन थेंबांचे आकाश,
लाटांनी सावरलेले
मन नक्षंत्रांचे रान,
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त,
मन रानभूल मन चकवा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन कळोखाची गुंफा,
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात,
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सुर्य कसा झेलावा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

चेहरा-मोहरा याचा,
कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही,
याच्यावीन दुसरा नाही
या अनोळखी नट्याचा,
कुणी कसा भरवसा द्यावा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

1 comment:

अनिल सुमति बागुल said...

ही कविता कवि ग्रेस ह्यांची नसून गीतकार सुधिर मोघे ह्यांची आहे.